चारित्र्यावर संशयावरून पतीनं पत्नीला निर्घृणपणे संपवलं; आरोपी पती फरार
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकच्या पंचवटीतून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नवऱ्यानेच बायकोचा निर्घृणपणे खून करत हत्या केली आहे. शीतल भामरे असे मृत महिलेच नाव आहे. तर संशयित आरोपी नितीन भामरे असे पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र संशयित आरोपी पती फरार झाल्याची माहिती आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तापस पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून गळा आवळून हि हत्या केल्याची माहिती आहे. बायकोचा खून करून घराचा दरवाजा बंद करून नितीन भामरे फरार झाला. मात्र उशिरा नंदेने शोध घेतला असता रात्री ही घटना उघडकीस आलीय. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नितीनने शीतलला मारहाण केली आणि नंतर दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित आरोपी नितीन भामरे फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.