भिवंडीत गावठी दारूचा मोठा साठा जप्त; १,११५ लिटर दारूसह आरोपी अटकेत

Spread the love

भिवंडीत गावठी दारूचा मोठा साठा जप्त; १,११५ लिटर दारूसह आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी : भिवंडीत गुन्हे शाखा घटक-२ पथकाने मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी दारूचा सुमारे १,११५ लिटर साठा जप्त केला असून याची बाजार किंमत सुमारे १ लाख ११ हजार ५०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी रूपेश नारायण पाटील (वय ३५, रा. आलिमघर, भिवंडी) याला अटक करण्यात आली आहे.

दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी पोटहवा ५५३४ किशोर थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव व त्यांच्या पथकाने आलिमघर परिसरात छापा टाकला. आरोपीच्या घरालगत असलेल्या खोलीत साठवून ठेवलेली हातभट्टीची तयार गावठी दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली.

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३०७/२०२५ नुसार दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेकर बागडे (शोध-१) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहा. पोनि. मिथुन भोईर, पोउनि. रामचंद्र जाधव, पोउनि. रविंद्र बी. पाटील, पोहवा किशोर थोरात, प्रकाश पाटील, शशिकांत यादव, निलेश बोरसे आणि पोअं. सर्फराज तडवी सहभागी होते.

भिवंडीत अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलल्याने बेकायदा धंद्यांवर लगाम बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon