मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये महिलांच्या दागिन्यांची चोरी करणारी महिला चोर जेरबंद
₹१.४५ लाख किमतीचे दागिने हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या एका महिलेला अखेर गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबईने अटक केली आहे. अनेक दिवसांपासून या गाड्यांमध्ये महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यानंतर विशेष पथकाने तपास सुरू करून संशयित महिलेवर लक्ष ठेवले.
शेवटी योग्य वेळी कारवाई करत पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ₹१,४५,००० किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.