कल्याणमध्ये ट्रक चालकांना कोयत्याचा धाक; व्हायरल व्हिडिओतील आरोपी अटक
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण (पूर्व) – श्री मलंगगड रोड परिसरात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ट्रक चालकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या इसमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संबंधित आरोपीची ओळख पटवली.
सदर व्यक्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे नाव मुमताज रवाबअली खान, राहणार अमरदीप कॉलनी, पिसवली, मलंग रोड, कल्याण (पूर्व) असे निष्पन्न झाले. याबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६(२), भारतीय हत्यार कायदा ४/२५, म.पो.का. ३७(१)१३५ तसेच क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) ऍक्ट कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला नमूद गुन्ह्यात अटक केली असल्याची माहिती कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी दिली.