२४ तासांत गुन्हे शाखेची चमकदार कामगिरी; प्रवाशाचे दागिने लंपास करणारा रिक्षाचालक अटकेत!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : महिला प्रवाशाची बॅग आणि सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या ऑटो-रिक्षा चालकाला गुन्हे शाखा युनिट-३च्या अधिकाऱ्यांनी केवळ २४ तासांच्या आत अटक केली आहे.
गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता, मात्र तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटो-रिक्षा पोलिसांनी जप्त केली असून, आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेच्या या जलद आणि यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.