ठाणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; नागरिकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्या!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा ‘सेवा, सुरक्षा आणि विश्वास’ या ब्रीदवाक्याला न्याय देत नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. कोपरी, नारपोली आणि नौपाडा पोलीस ठाण्यांच्या अधिकार्यांनी अथक प्रयत्नांनंतर तक्रारदारांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू शोधून काढत त्यांना परत केल्या आहेत.
या कामगिरीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले असून, ठाणे पोलिसांच्या दक्ष आणि प्रामाणिक सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, या घटनेमुळे ठाणे पोलिसांबद्दलचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ठाणे पोलिसांकडून पुन्हा एकदा संदेश –
“जनतेची सेवा हीच आमची जबाबदारी!”