फोर्टीज हॉस्पिटलजवळ ४०० कोरेक्सच्या बाटल्या जप्त; एकास अटक

Spread the love

फोर्टीज हॉस्पिटलजवळ ४०० कोरेक्सच्या बाटल्या जप्त; एकास अटक

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी परिमंडळ-३ चे मा. पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई पथकाने अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.

सपोनी गायकवाड आणि त्यांच्या पथकाने बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत गस्तीदरम्यान फोर्टीज हॉस्पिटल परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला अडवले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल ४०० कोरेक्सच्या बाटल्या आढळून आल्या.

पोलिसांनी नमूद इसमाला जागीच ताब्यात घेऊन पंचनाम्यांतर्गत मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासासाठी त्यास बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७६/२०२५ एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब)(क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद मताब अनिस रईस (वय ३३, रा. १०/बी गोल्डन प्लाझा, ओल्ड फिश मार्केट, मौलाना शौकत अली चौक, कल्याण पश्चिम) असे असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी एम.एफ.सी. पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २१८/२०२५ कलम ८(क), २१(ब) एनडीपीएस कायदा अंतर्गतही गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जप्त मुद्देमाल :

कोरेक्सच्या ४०० बाटल्या, किंमत सुमारे ₹४,००,०००/-

काळ्या रंगाची मोटारसायकल, किंमत ₹६०,०००/-

रोख रक्कम ₹३,६६०/-

या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या विक्रीवर मोठा आळा बसण्याची शक्यता असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon