घाटकोपरमध्ये आरएसएस रॅलीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

Spread the love

घाटकोपरमध्ये आरएसएस रॅलीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

रवि निषाद / मुंबई

मुंबई (घाटकोपर पूर्व) – रमाबाई कॉलनी आणि कामराज नगर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर्फे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी मोठ्या प्रमाणावर रॅली काढण्यात आली. या भागात संघाची एकही शाखा नसतानाही काढलेल्या या रॅलीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन छेडले.

घाटकोपर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. जिल्हा काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत “काँग्रेस आणि समविचारी लोकांसाठी आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे. आरएसएस च्या विभाजनकारी आणि अमानवतावादी विचारसरणीविरोधात आम्ही ठाम आहोत,” असा इशारा दिला.

सूत्रांनुसार, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतनगर पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले आहेत. या आंदोलनात काँग्रेसचे नेते सतीश शिंदे, तसेच अनेक आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते.

हा आंदोलनात्मक उपक्रम आरएसएस च्या कथित अमानवतावादी भूमिकेविरोधात काँग्रेस आणि आंबेडकरवादी विचारवंतांच्या एकजुटीचं प्रतीक ठरल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon