भांडुप पोलीसांची दमदार कारवाई; जैन मंदिरातून चांदीचा कळस चोरणारा आरोपी ६ तासांत गजाआड!

Spread the love

भांडुप पोलीसांची दमदार कारवाई; जैन मंदिरातून चांदीचा कळस चोरणारा आरोपी ६ तासांत गजाआड!

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : भांडुप येथील जैन मंदिरातून चांदीचा कळस चोरल्याच्या प्रकरणात भांडुप पोलिसांनी केवळ सहा तासांत आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नरेश अमरचंद उर्फ अगरचंद जैन (वय ५०, रा. खेतवाडी, गिरगाव) असे असून, याच्यावर मुंबई आणि ठाणे परिसरातील जैन मंदिरांमधील चोरीचे आणखी काही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

भांडुप पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ८९४/२०२५ कलम ३८०(ड) भा.दं.सं. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादी संदीप जयंतीलाल राजावत (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:२४ वाजता ईश्वरनगर येथील भगवान पार्श्वनाथ मूर्तिपूजक तपगच्छ संघाच्या जैन मंदिरात पुजाऱ्याचा वेष धारण करून आरोपीने मंदिरातील मूर्तीसमोरील चांदीचा कळस चोरला होता.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपी नरेश जैन याची ओळख पटली. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटिकरण पथकाने खेतवाडी परिसरात सापळा लावून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीविरुद्ध पूर्वीही अनेक गुन्हे नोंद असून,

१. ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाणे गु.र.क्र. ९९/२०२५ कलम ३८०(अ) भा.दं.सं.
२. नागपाडा पोलिस ठाणे गु.र.क्र. ७१०/२०२५ कलम ३८०(ड) भा.दं.सं.
तसेच आग्रीपाडा, व्ही.पी. रोड आणि मिरा-भाईंदर परिसरातील जैन मंदिर चोरी प्रकरणांशी देखील त्याचा संबंध असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. सदर आरोपींची मालमत्ता हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेकवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो.ह. हिरालाल चरंडे, पो.शि. अनिकेत आटपाडकर व विजयकुमार पवार यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली. राकेश ओला (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७, मुलुंड), प्रिनाम परब (सहायक पोलीस आयुक्त, भांडुप विभाग), बाळासाहेब पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भांडुप पो.ठा.), नितीन चव्हाण (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, भांडुप). भांडुप पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon