पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! ४ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
रवि निषाद / मुंबई
मुंबई – घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रमाबाई कॉलनी मध्ये राहणाऱ्या एका अलपवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय आरोपीला ४ तासात आत अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव हर्षल गोवर्धन शर्मा उर्फ़ आवली (२०) सांगण्यात येत आहे.
पंतनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा क्र. ११३७/२०२५ कलम ६४,६५(२), ७४,१३७(२) भारतीय न्याय संहिता सह पोस्को कायदा कलम ४,६,८,१२ प्रमाणे दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी मानवी आणि तांत्रिल तपास करुन गुप्त माहितीद्वारे तात्काळ हर्षल शर्मा उर्फ़ आवलीला अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी शांतीसागर पोलिस सोसायटीच्या मागे राहणाऱ्या एका १० वर्षाचा मुलीला फुस लावून तिला आपल्या मित्राच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिचावर बलात्कार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हर्षल गोवर्धन शर्मा उर्फ आवली वय २० वर्षे,रा. प्रियदर्षन झोपडपट्टी संघ,गल्ली येथे नं.२,शांतीसागर सोसायटीच्या मागे,रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर, पूर्व इथे राहणारा आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस अधिक तपास करत आहे.