मुंब्रा पोलिसांची तत्पर कारवाई! हरवलेली अडीच वर्षांची विआना काही तासांत सुखरूप मिळाली
पोलीस महानगर नेटवर्क
मुंब्रा – मुंब्रा पोलीस ठाण्याच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यामुळे हरवलेली अडीच वर्षांची बालिका विआना काही तासांत सुखरूप सापडली आहे. या घटनेमुळे परिसरात दिलासा व्यक्त केला जात असून, बालिकेच्या पालकांनी मुंब्रा पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विआना अचानक हरवल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला आणि सामाजिक माध्यमांचाही वापर करून शोध सुरू ठेवला. अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना विआना सुरक्षित अवस्थेत सापडली.
या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल नागरिकांनी मुंब्रा पोलिसांचे कौतुक केले आहे. बालिकेचे पालक म्हणाले, “आमच्या मुलीला इतक्या लवकर परत मिळवून दिल्याबद्दल आम्ही संपूर्ण पोलीस दलाचे आभारी आहोत.”
मुंब्रा पोलिसांच्या या संवेदनशील आणि जबाबदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा जनतेचा विश्वास दृढ झाला आहे.