मुंबई रेल्वे पोलीसांकडून सायबर जनजागृती उपक्रम; रेल्वे प्रवाशांना दिले सायबर सुरक्षिततेचे मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमार्फत सध्या सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे रेल्वे प्रवाशांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले जात असून, ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पोलीस अधिकारी प्रवाशांशी संवाद साधून विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविषयी, जसे की फिशिंग, बनावट केवायसी, ओटीपी शेअरिंग, आणि डिजिटल ब्लॅकमेल याविषयी माहिती देत आहेत. तसेच, सायबर तक्रारी नोंदविण्यासाठी उपलब्ध ऑनलाईन पोर्टल्स आणि हेल्पलाइन क्रमांकांचीही माहिती प्रवाशांना देण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढत असून, “सावध रहा, सुरक्षित रहा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात मुंबई रेल्वे पोलीसांना यश येत आहे.