“मिशन परिवर्तन अंतर्गत जप्त गांजा नष्ट”
पोलीस महानगर नेटवर्क
बुलडाणा – जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मिशन परिवर्तन अंतर्गत ११ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला गांजा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची रीतसर परवानगी घेऊन विशेष दक्षतेने नष्ट करण्यात आला. यामुळे परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणास हातभार लागेल आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल.