आंदेकर टोळीचं गुणगान गाणं चांगलंच महागात पडलं; पोलीसांनी ५ पोरांना घेतले ताब्यात

Spread the love

आंदेकर टोळीचं गुणगान गाणं चांगलंच महागात पडलं; पोलीसांनी ५ पोरांना घेतले ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीचं समर्थन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी करवाई केली आहे. ही तीच नाना पेठ आहे ज्या ठिकाणी कधीकाळी आंदेकर टोळीची दहशत होती. आता तिकडेच त्याच्या टोळीतील गुंडांची धिंड काढली जात आहे.१८ ते २० वर्षे वय असलेल्या पोरांना आंदेकर टोळीचं गुणगान गाणं चांगलंच महागात पडलं आहे. या पोरांनी गुन्हेगारीला उत्तेजन देणारे व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून प्रसारित केले होते. पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने या पोरांना शोधून काढलं. त्यांना बेड्या ठोकल्या. या पोरांनी आंदेकर टोळीचं समर्थन करताना, “बदला तो फिक्स है…आता फक्त बॉड्या मोजा, अशा पद्धतीचं स्टेटस आणि व्हिडीओ तयार केले होते.

मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पीयुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगु अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गुन्हेगारीला उत्तेजना देणारे व्हिडिओ प्रसारित केले होते. ज्यामध्ये आंदेकर टोळीचं उदातीकरण केलं जात होतं. “बदला तो होगा…रिप्लाय फिक्स, आता फक्त बॉड्या मोजा… शेर था मेरा बॉस….वन ॲण्ड ओन्ली कंपनी… बदला भी ऐसा लेंगे, रास्ते पर साबुन का पानी नही खून की नदीया बहेगी… कंपनी वापस आ रहे हे, वापस वही पुराने अंदाज मे…” अशा पद्धतीचा मजकूर त्यात होता.

अशा प्रकारचे स्टेटस ठेवून एक प्रकारे गुन्हेगारीचे उदातीकरण केले जात होतं. गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं. नेमकं पोलिसांनी हेच पाहून या आरोपीला अटक केली. सर्व आरोपींना कोर्टात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेतली. खरंतर अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपींना लगेच जामीन मंजूर होतो. मात्र समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांनी आरोपींचा गुन्हा किती गंभीर आहे, भविष्यात याचे परिणाम काय होऊ शकतात हे कोर्टाला पटवून दिलं. त्यानंतर कोर्टाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. पोलीस इतक्यावरच थांबले नाहीत तर ज्या परिसरात राहून हे अशा प्रकारचे विखारी स्टेटस मिरवत होते, त्याच परिसरात याची धिंड काढली.

कधीकाळी हे या परिसरात भाईगिरी करायचे मात्र पोलिसांनी त्यांची ही भाईगिरी झटक्यात उतरवली. अशा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करू नका असं सांगत या पोलिसांनी एक प्रकारे स्थानिक नागरिकांना संदेशही दिलाय. आंदेकर टोळीचे एक एक कारनामे बाहेर येत आहेत. पोलीस त्यावर कारवाई करताना दिसत आहेत. आंदेकर टोळीची अनेक अनधिकृत बांधकाम उध्वस्त करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणाहून तो खंडणी वसूल करायचा ती ठिकाणं उध्वस्त करण्यात आली आहेत. आंदेकरला सपोर्ट करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आंदेकर कुटुंबातील दहा ते पंधरा जण सध्या तुरुंगात आहेत. यात महिलांचाही समावेश आहे. तरीही या गँगची मस्ती कमी झाली नव्हती. तिच मस्ती आता पोलीसांनी उतरवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon