कुख्यात गुंड निलेश घायवळला राजकीय पाठबळ? शिंदे गटाच्या माजी मंत्र्याचे नाव चर्चेत

Spread the love

कुख्यात गुंड निलेश घायवळला राजकीय पाठबळ? शिंदे गटाच्या माजी मंत्र्याचे नाव चर्चेत

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला असता तो लंडनला फरार झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे घायवळवर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर मकोका अंतर्गतही प्रकरण नोंदवले गेले आहे. अशा परिस्थितीत त्याला परदेशात जाणे शक्य कसे झाले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घायवळने आपले आडनाव बदलून “गायवळ” असे दाखवत तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. अहिल्यानगर पत्ता दाखवून ऑनलाइन नोंदणीही केली होती. मात्र पोलीस व्हेरिफिकेशन न झाल्याने “NOT AVAILABLE” असा उल्लेख करून प्रकरण पुन्हा पुणे विभागीय कार्यालयात पाठवण्यात आले होते. तरीही त्याला पासपोर्ट कसा मिळाला, हे अद्याप गूढच आहे.

या सर्व प्रक्रियेत राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे पोलिसांमध्ये आणि स्थानिक वर्तुळात बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळला शिंदे गटातील एका माजी मंत्र्याचा – जे सध्या विद्यमान आमदार आहेत – थेट वरदहस्त लाभले होते. हे आमदार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहतात.

धाराशीव जिल्ह्यातील पनवचक्की प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात खंडणी वसुलीतही या आमदारांचा घायवळला पाठिंबा असल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर “बूथ मॅनेजमेंट”मध्येही त्याचं नाव जोडले गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या सोबत घायवळचा फोटोही व्हायरल झाला होता.

निलेश घायवळने गुन्हेगारीतून मोठी संपत्ती कमावत परदेशात गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर येत असून, त्याचा मुलगा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. तो स्वतःही आता तेथे असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, या प्रकरणामुळे निलेश घायवळला पाठबळ देणारा शिंदे गटाचा माजी मंत्री आणि विद्यमान आमदार कोण? या प्रश्नावर पुण्यात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon