विसरलेली वैद्यकीय कागदपत्रे वागळे इस्टेट पोलिसांच्या तत्परतेने परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : रिक्षाप्रवासात महत्त्वाची वैद्यकीय कागदपत्रे विसरल्याने त्रस्त झालेल्या तक्रारदाराला वागळे इस्टेट पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे दिलासा मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने प्रवासादरम्यान रिक्षामध्ये वैद्यकीय कागदपत्रे विसरली होती. तक्रार मिळताच पोलीस शिपाई वाघमारे आणि पाटील यांनी तात्काळ शोधमोहीम राबवली. काटेकोर तपास आणि प्रयत्नांनंतर संबंधित रिक्षाचा शोध घेऊन त्यांनी कागदपत्रे सुरक्षितरीत्या तक्रारदाराकडे परत दिली.
या कामगिरीबद्दल तक्रारदाराने वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे आभार मानले असून, नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस नेहमीच तत्पर असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.