नागरिकांच्या सेवेसाठी ठाणे पोलीस तत्पर : महिला अंमलदार घोडे यांनी शोधून दिले नागरिकांचे हरवलेले मोबाईल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : राबोडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार घोडे यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून काढत त्यांना परत केले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
ठाणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वाढत्या मोबाईल चोरी किंवा हरवण्याच्या घटनांमध्ये तक्रारदारांना वेळेत दिलासा मिळावा यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याच मोहिमेत अंमलदार घोडे यांनी काटेकोर तपास करत मोबाईल शोधून काढले.
हरवलेली मालमत्ता सुरक्षितपणे परत मिळाल्याने नागरिकांनी ठाणे पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली असून, “नागरिकांच्या सेवेसाठी ठाणे पोलीस नेहमी तत्पर” हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.