मुंबईतील क्राईम मिस्ट्री उलगडा; पत्नी अन् मुलानेच केला पोलीसाचा घात. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक

Spread the love

मुंबईतील क्राईम मिस्ट्री उलगडा; पत्नी अन् मुलानेच केला पोलीसाचा घात. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई पोलिस दलातील पोलिस हवालदाराच्या पत्नी आणि मुलालाच पोलिसाच्या मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रवीण शालीग्राम सुर्यवंशी असे या मृत पोलिसाचे नाव आहे. मे महिन्यात प्रतिक्षानगर पोलिस अधिकारी वसाहत, सायन पूर्व येथे प्रवीण यांचे पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांच्यासोबत कौटुंबिक वाद झाला होता, या वादातून दोघांनी प्रवीण सुर्यवंशी यांना खोलीतील खिडकीच्या काचेवर ढकलून दिले. यावेळी खिडकीची काचांनी प्रवीण यांच्या उजव्या हाताच्या नसा खोलवर कापल्या गेल्या, डोक्यालाही गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यावेळी प्रवीण यांना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात नेहणं अपेक्षित असताना दोघांनी वैद्यकिय उपचारासाठी नेले नाही. त्यावेळी प्रवीणच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सुरूवातीला वडाळा टीटी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान वडाळा टिटि पोलिसांनी आता प्रवीणची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी वडाळा टिटि पोलिस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, प्रवीण सुर्यवंशी यांच्या मृत्यूला सुरुवातीला साधा अपघात मानण्यात आला होता. मात्र चौकशीतून कळले की कौटुंबिक वाद चिघळल्यानंतरच हा प्रकार घडला होता. खिडकीच्या काचेवर आदळल्यानंतर रक्तस्त्राव थांबविण्यासाठी आवश्यक ती मदत किंवा तातडीची वैद्यकीय उपचार व्यवस्था करण्यात आली नाही, ही बाब तपासात गंभीर मानली गेली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उपचारासाठी वेळेत दवाखान्यात नेले असते तर प्रवीण यांचा जीव वाचू शकला असता. या बेपर्वाईमुळे आणि जाणूनबुजून दुर्लक्षामुळेच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच सुरुवातीला दाखल करण्यात आलेली अपमृत्यूची नोंद बदलून आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या धक्कादायक घटनेमुळे पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon