डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलद्वारे २३ हरवलेले मोबाईल शोधून लाखोंचा मुद्देमाल परत
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवली पोलिसांनी हरवलेल्या मोबाईल शोधण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या तंत्रज्ञानाधारित पोर्टलच्या मदतीने तब्बल २.५ लाख रुपये किंमतीचे २३ मोबाईल हँडसेट शोधण्यात पोलिसांना यश आले. यापैकी १.१० लाख रुपये किंमतीचे ७ मोबाईल प्रत्यक्ष मालकांना परत देण्यात आले असून उर्वरित मोबाईलही लवकरच तक्रारदारांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये डोंबिवली पोलिसांविषयी विश्वास व समाधान व्यक्त होत असून हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या मौल्यवान वस्तू त्वरित परत करण्याची ही कार्यपद्धती पोलिसांचे जनसंपर्क दृढ करणारी ठरत आहे.