अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर
योगेश पांडे / वार्ताहर
बरेली – बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये झालेल्या चकमकीत दोघांनाही ठार करण्यात आलं आहे. ही चकमक यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत घडली आहे. रवींद्र हा रोहतकचा रहिवासी होता आणि अरुण हा सोनीपतचा रहिवासी होता. दोघेही गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीचे सक्रिय सदस्य होते. घटनास्थळावरून एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित गोदरा-गोल्डी ब्रार टोळीशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे. एसटीएफ पथकाने घटनास्थळावरून एक ग्लॉक, एक जिगाना पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. १२ सप्टेंबर रोजी पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बरेलीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात दिशा पटानी यांच्या कुटुंबाच्या घराबाहेर ८ ते १० राउंड गोळीबार केला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार,बुधवारी पहाटे ३ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास हा गोळीबार केला होता. या घटनेनंतर दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी (निवृत्त डीएसपी) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी तिला पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले होते. अधिकाऱ्यांना या प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अभिनेत्री दिशा पटनीच्या घरावर १२ सप्टेंबर रोजी दुपारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. हे दोघेही बाईकवर आले आणि घरावर अनेक ठिकाणी फायरिंग करून पळून गेले होते. या घटनेनंतर दिशा पाटनीच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गल्लीतल्या मुख्य दरवाज्यावर लोखंडी गेट बसवण्याचे काम सुरू असून ते वेगाने सुरू करण्यात आले होते.