मालाड बारजवळ युवकाची हत्या; पोलिसांचा डान्स बारवर धडक कारवाईचा इशारा 

Spread the love

मालाड बारजवळ युवकाची हत्या; पोलिसांचा डान्स बारवर धडक कारवाईचा इशारा 

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई – पश्चिम उपनगरातील डान्स बारची उशिरापर्यंत सुरू असलेली बेकायदेशीर मजल अखेर जीवघेणी ठरली. मालाड पश्चिम चिंचोली बंदर येथील गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंट जवळ झालेल्या भांडणात कल्पेश भानुशाली (वय २८) या युवकाची निर्घृण हत्या झाली. मालाड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल (गुन्हा क्र. ०५४२/२५) करण्यात आला आहे. मुख्य आरोपी संजय मकवाना याला अटक झाली असून, त्याचे साथीदार हेमंत पटेलसह चार जण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हत्या कशी घडली?

सूत्रांच्या माहितीनुसार, जेवणावरून झालेल्या वादातून संजय मकवाना व त्याच्या मित्रांनी कल्पेशवर लाथाबुक्क्या, बिअर बाटली आणि धारदार हत्याराने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याच्यावर भारतीय न्याय संहिता १८९(१), १८९(२), १९१(१)(२)(३), १९०, १०३(१), ३५२, ३५१(१), ३७(१)(अ), १३५

मृतकाचा भाऊ परेश भानुशाली याने रोष व्यक्त करताना म्हटले की, “जर गुरुकृपा बार एवढ्या उशिरापर्यंत सुरू नसता, तर माझ्या भावाचा जीव वाचला असता. किरकोळ भांडणावरून माझ्या भावाची हत्या झाली.”

संदीप जाधव (पोलिस उपायुक्त, परिमंडल ११) यांनी सांगितले, “रात्री साधारण १:३० वाजता पाच जणांनी एका युवकाची हत्या केली. एक आरोपी अटकेत असून उर्वरित फरार आहेत. पुढील तपास सुरू आहे.”

पश्चिम उपनगरातील डान्स बार पहाटेपर्यंत सुरू

मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली व दहिसर परिसरातील अनेक डान्स बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस कारवाई टाळण्यासाठी बार मालक पुढचा शटर बंद ठेवतात, मात्र मागच्या दरवाज्यातून, किचनमधून किंवा खास गेटमधून ग्राहकांना आत घेतले जाते. बारसमोर मॅनेजर व बाऊंसर तैनात असतात. नवीन ग्राहकांना आत घेण्याची ठराविक यंत्रणा असते. बारमध्ये घडलेल्या घटनांचे पुरावे लगेच पुसले जातात, जेणेकरून मामला पोलिसांपर्यंत पोहोचू नये. आणि जर पोलिस ठाण्यात गेला तरी, “बार रात्री ३ वाजता बंद होता, घटना बाहेर घडली” असा युक्तिवाद करत खोटे पुरावे सादर केले जातात.

बारसमोर विदेशी गाड्या, बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसह राजकीय नेत्यांच्या गाड्याही दिसतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली. मुंबई पोलिस आयुक्त देवन भारती आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे संयुक्त पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “पश्चिम उपनगरातील डान्स बार पहाटेपर्यंत सुरू राहणार नाहीत. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.” या घटनेनंतर पोलिसांनी पश्चिम उपनगरातील डान्स बारवर धडक कारवाईची तयारी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon