अकोलामध्ये मुलाकडून वडिलांचा खून; पोलिसांची दोन तासांत आरोपीला केले गजाआड
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला – जिल्ह्यातील पिंजर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत वडिलांच्या खुनाचा आरोपी मुलगा अवघ्या दोन तासांत जेरबंद केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ग्राम टीटवा येथील बबन रामराव राऊत (वय ५५) यांचा त्यांच्या मुलगा नवनाथ बबन राऊत (वय २७) याने खून केला. रात्री १० ते १२.१५ च्या सुमारास आरोपीने वडिलांवर काठीने मारहाण केली तसेच दोरीने गळा आवळून त्यांचा खून करून पसार झाला. या घटनेची फिर्याद मृताचा भाऊ विनोद राऊत यांनी पिंजर पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीवरून पिंजर पोलीस ठाण्यात गु.र. २३२/२५ कलम १०३(१) भारतीय न्याय सहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करून स्थानिक गुन्हे शाखेलाही पाचारण करण्यात आले. मुलाने खून करून संपूर्ण रात्र शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे सकाळी आरोपी शेलू (जि. वाशीम) येथून संभाजीनगर-पुणेच्या दिशेने जात असताना पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपीकडे मोबाईल नसल्यामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरली होती, मात्र कसून तपास व जलदगतीने केलेल्या कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत आरोपीला गजाआड करण्यात आले.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.के. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे, स्था.गु.शा. पो.नि. शंकर शेळके यांनी केले. कारवाईत ठाणेदार गंगाधर दराडे, स.पो. अभिषेक नवघरे, स.पो. गोपाल जाधव, जी.पी.सी. दशरथ बोरकर, हे. गोकुळ चव्हाण, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, चालक मनीष ठाकरे, हे.कॉ. नामदेव मोरे, हे. नागसेन, एच.सी. नागेश दांडी, पीसी नरहरी देवकाते, पीसी भूषण मुखमळे, पीसी भागवत गांजवे, पीसी मयूर खडसे, एचजी नजीर हुसेन, एचजी गणेश जानोरकर आदींचा विशेष सहभाग होता.