छत्रपती संभाजीनगर हादरलं! प्रेमसंबंधातून खून, पोलिस तपासाचा थरारक उलगडा

Spread the love

छत्रपती संभाजीनगर हादरलं! प्रेमसंबंधातून खून, पोलिस तपासाचा थरारक उलगडा

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : शहरात थरार माजवणारा खून प्रकरण उघडकीस आले आहे. मागील १९ दिवसांपासून बेपत्ता असलेला सचिन अवताडे (वय ३२, रा. हर्मूल) याचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात सापडला. धक्कादायक बाब म्हणजे छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा भारती दुबे हिनेच प्रेमसंबंधातून अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून आपल्या मामेभावा व मित्राच्या मदतीने सचिनचा खून केला. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

प्रेमातून वाद… आणि खून!

भारती दुबे ही पतीपासून विभक्त होऊन कॅनॉट प्लेस परिसरात राहत होती. सचिनसोबत तिची ओळख छावा संघटनेत काम करताना झाली. चार वर्षांत ही मैत्री प्रेमात रूपांतरित झाली.
३१ जुलै रोजी दोघे दारू सेवन करून भारतीच्या फ्लॅटवर गेले. याच ठिकाणी भारतीचा मामेभाऊ दुर्गेश तिवारी आणि त्यांचा मित्र अफरोज आले. चौघांमध्ये वाद झाला आणि तिघांनी मिळून सचिनवर बेदम मारहाण करत चाकूने वार करून त्याचा खून केला.

मृतदेह नदीपात्रात, ओळख टॅटूमुळे

सचिन ३१ जुलैपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी हसूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.१३ ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह आढळला. मानेवरील व हातावरील टॅटूवरून मृतदेह सचिनचाच असल्याचे ओळख पटली.

सीसीटीव्हीने फोडला कट

सचिन गायब झाल्यानंतर भारतीही फ्लॅटवरून बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तब्बल ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात भारती, दुर्गेश आणि अफरोज ताडपत्रीमध्ये मृतदेह नेत असल्याचे स्पष्ट दिसले. दरम्यान, भारती बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे लपल्याचे समजले. पोलिसांनी शेतातून तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून खून केल्याची कबुली दिली.

तिघेही आरोपी पोलिस कोठडीत

या प्रकरणी भारती दुबे, दुर्गेश तिवारी आणि अफरोज या तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रेमसंबंधातून घडलेला हा थरारक खून छत्रपती संभाजीनगरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon