देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटचे ४ धडाकेबाज निर्णय; तब्बल १५ हजार पोलिसांची होणार भरती
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपली आहे.मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलीसपदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलिस दलात तब्बल १५ हजार नवीन भरतींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
१) अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
२)विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी देण्याचा निर्णय.
३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.आणि
४) गृह विभाग- महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५, ००० पोलिस भरतीस मंजुरी.
पोलीस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच सज्ज व्हायला हवे. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत, या तिन्ही टप्प्यांसाठी सखोल तयारी करणे गरजेचे आहे. तसेच, भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नीट तपासावी. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. एकनाथ शिंदे हे सध्या श्रीनगरमध्ये आहेत. त्यामुळे ते या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिले. तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही मंगळवारच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. रायगड जिल्ह्यात १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना दिल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना दिले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भरत गोगावले हे नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. मात्र, भरत गोगावले यांनी दिल्लीत काही काम असल्याने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले.