एकनाथ खडसेंचं मोठं विधान; पुणे पोलिसांवर ठोकणार अब्रु नुकसानीचा दावा

Spread the love

एकनाथ खडसेंचं मोठं विधान; पुणे पोलिसांवर ठोकणार अब्रु नुकसानीचा दावा

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – खराडी येथील रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली, ज्यानंतर खळबळ उडाली. प्रांजल यांना अटक झाल्यानंतर खडसेंनी मोठा संशय व्यक्त केला. आता तर त्यांनी थेट पुणे पोलिसांवरच आरोप केली आहेत. प्रांजल खेवलकर याला अडकवण्याचा कट होता आणि त्याची पाळत ठेवली जात असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी स्पष्ट केली की, माझा कोणत्या मंत्र्यावर आरोप नाही तर माझा पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय आहे. कुठलेही संगीत नाही, आदळाआपट नाही. मला जरा रेव्ह पार्टीची व्याख्या सांगावी पोलिसांनी. बदनामी करण्यासाठी पोलिसांनी रेड टाकली आहे. रेव्ह पार्टीच्या आडुन बदनामी करण्याचा डाव आहे. खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. जावयाकडून मला ही माहिती देण्यात आली की, मी कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. सिव्हील ड्रेसमधील पोलीस पाळत ठेवत होते.

एवढी पोलिसांनी तत्परता दाखवली, हिच तत्परता लोढा प्रकरणात का दाखवली नाही?. कोणी तरी यात सुत्रधार आहे, माझ्या परिवाराचे फोटो कसे बाहेर काढले जात आहेl. २ ग्राम आसता तर जामीन झाला आसता, २.७ ग्राम दाखवणे, गांझा दाखवणे, याचा अर्थ काय. मुळात म्हणजे जावयाकडे ड्रग्ज सापडलाच नाही. एका मुलीकडे सापडला आहे. याला जर रेव्ह पार्टी म्हणायचं तर प्रत्येक घरात रेव्ह पार्टी होईल. पोलिसांना काय अधिकार आहे, असे व्हिडीओ बाहेर देण्याचा. ससूनचा रिपोर्ट बाहेर कसा आला. ड्रग्जचा रिपोर्ट का आला नाही. मेडिकल रिपोर्ट का येत नाही मला संशय येतोय. एकंदरीत हा प्रकार संशयस्पद आहे. जर चुकीचे असेल तर कारवाई झाली पाहिजे. सरकार आणि पोलिसांनी यावर बोललं पाहिजे.

मोबाईल, लॅपटॉप जप्त केलाय. मात्र त्या मोबाईलमधील फॅमिली फोटो बाहेर आले कसे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. संशयाला जागा आहे. अलीकडे सरकार विरोधात रोहिणी खडसे बोलत आहेत, त्यामुळे असं बदनाम केलं जात आहे. याचा अर्थ आम्ही दबून जाईल, असे नाही. लोढाने मला सीडी दाखवली आहे. हे व्हायच्या आधी माझ्या जावयाने सांगितलं होत. मला कुणावर आरोप करायचा नाहीय. यासंदर्भात मी पुणे पोलिसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे, वकिलांशी चर्चा झाली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon