ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक; गुन्हे शाखा काशिमीरा यांची कारवाई, ₹१.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
मिरा-भाईंदर – शहरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर ई-सिगारेट्स विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमीरा पथकाने मिरारोड (पूर्व) येथील कनकिया रोड परिसरात कारवाई करत एक आरोपी अटकेत घेतला असून ₹१.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी २:५० वाजता, गुन्हे शाखेच्या पथकाने जांगीड एनक्लेव्ह बिल्डिंगजवळ, कनकिया रोड, मिरारोड पूर्व येथे छापा टाकून रेहान सिराज अहमद शेख (रा. नयनगर, मिरारोड पूर्व) या इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एल्फबार राया डी३ ब्लॅक गोल्ड एडिशन २५ नग, एल्फबार मूनियंट ४० हजार १३ नग, युओटो थॅनोस ५०००, ११ नग, थॅनोस ५०००, एल्फबार राया डी ३५ नग व वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल – १ नग असा एकूण बाजारमूल्य: ₹ १,८८,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५०/२०२५ प्रमाणे ई-सिगारेट प्रतिबंध कायदा, २०१९ च्या कलम ४, ५, ७, ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. मदन बल्लाळ, पोनि. प्रमोद बडाख, सपोनि. सचिन सानप, पोउपनिरीक्षक: उमेश भागवत, संदीप शिंदे, सफौ: अशोक पाटील, अविनाश गर्ने, संजय शिंदे, पो.ह.: संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, पो.शि.: गौरव बारी, सौरभ इंगळे, धीरज मेंगाणे,म.सु.ब.किरण आसवले व इतरांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही कारवाई शहरात बेकायदेशीर ई-सिगारेट्सच्या साखळीवर मोठा आघात मानली जात असून, तरुण पिढीच्या आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांचा निर्धार दिसून येतो.