खडकपाडा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: मोबाईल स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी प्रकरणात १२.५ लाखांचा ऐवज हस्तगत

Spread the love

खडकपाडा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: मोबाईल स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी प्रकरणात १२.५ लाखांचा ऐवज हस्तगत

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – खडकपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या धडक कारवाईत मोबाईल स्नॅचिंग व मोटारसायकल चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले असून, या प्रकरणात गाझी उर्फ टक्की लकीर हुसेन (वय १९) याला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडून एकूण १२,५०,०००/- रुपये किमतीच्या १४ मोबाईल फोन आणि ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

✅ गुन्ह्याचा तपशील:

खडकपाडा पो.ठा. गु.र.नं. ६०६/२०२५, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये चोरी झालेली होंडा अ‍ॅक्टीव्हा (एमएच-०५-ईके-३३०५) या मोटारसायकलचा तपास सुरू असताना स.पो.नि. विजय गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गाझी उर्फ टक्की याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून समोर आले की, त्याने दोन विधी संघर्षग्रस्त साथीदारांसोबत मिळून या चोरीचे गुन्हे केले होते.

हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांची माहिती:

क्र. पोलीस ठाणे गु.र.नं./कलम वाहन अंदाजे किंमत

१ खडकपाडा ६०६/२०२५, भारतीय न्याय संहिता ३०३(२) होंडा अ‍ॅक्टीव्हा (एमएच-०५-ईके -३३०५) रु.१,००,०००/-
२ भिवंडी तालुका १४५/२०२४, भादंवि ३७९ बजाज पल्सर एनएस (एमएच-०४-एलव्ही -१३४६) रु.२,००,०००/-
३ शिळ डायघर ७३६/२०२५, भारतीय न्याय संहिता ३०३(२) रॉयल एनफिल्ड हंटर (एमएच-०४-एलजे-७८२५) रु. २,२५,०००/-
एकूण वाहन किंमत: रु. ५,२५,०००/-

मोबाईल कंपनी व मॉडेल रंग/आयएमईआय क्रमांक किंमत

सॅमसंग अल्ट्रा ५ २४ग्रे, रु. १,६०,०००/-
वन प्लस ओपन,ब्लॅक रु. १,५०,०००/-
वन प्लस १३आर ग्रे, रु. ५०,०००/-
टेक्नॉ स्पार्क, पिस्ता रु. १०,०००/-
मोटोरोला जी ३४, निळसर (बंद स्थिती) रु. १५,०००/-
विवो वी २९ ई,वजांभळा (बंद स्थिती) रु. १८,००००/-
विवो वाय २८, जांभळा (बंद स्थिती) रु. २०,०००/-
ओप्पो ए ३७ गोल्डन (बंद स्थिती) रु. १०,०००/-
विवो वाय १८,मरून रु. ३२,०००/-
रिअलमी १३, प्रो, क्रीम, रु. ४०,०००/-
ओप्पो रेनो, ७, प्रो, ब्लू , रु. ३०,०००/-
वन प्लस नोर्ड, सी ४,ब्लू (बंद स्थिती) रु. १,३५,०००/-
आयफोन १, पांढरा (बंद स्थिती) रु. ५०,०००/-
वन प्लस,१२ आर, काळा (बंद स्थिती) रु. ५०,०००/-
एकूण मोबाईल किंमत: रु.७,२५,०००/-

सदर यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, अतुल झेडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार – पोहवा भोईर, बुधकर, लोखंडे, पोकों काळे, बगाड, शिंदे यांनी केली. खडकपाडा पोलिसांच्या या बक्षीसपात्र कारवाईमुळे कल्याण परिसरात मोबाईल चोरी व दुचाकी चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.
या उत्कृष्ट तपासाबद्दल सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon