कल्याण येथील क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण; मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Spread the love

कल्याण येथील क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण; मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय तरुणाने क्लिनिकमध्ये बेदम मारहाण केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. नांदिवली येथील श्री बालचिकित्सा क्लिनिक मध्ये डॉक्टरांच्या केबिनमध्ये घूसणाऱ्या व्यक्तीला आत जाऊ नका, आत लोक आहेत असे रिसेप्शनिस्ट तरुणीने सांगितले, तर त्या व्यक्तीने त्या तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. गोकुळ झा असे मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पीडीतेने सांगितले की मी बालचिकित्सालय नांदीवली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला आहे. साडे सहाच्या दरम्यान अनन्या झा म्हणून रुग्ण होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा नातेवाईक होता. तो आत जाण्यास घाई करत होता. मी त्याला अडविले म्हणून त्यांने मला शिवीगाळ केली. मी त्याला म्हणाली ही बोलण्याची पद्धत आहे का? तर त्याने मला मारहाण केली. गोकुळ झा असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे आम्हाला समजलं आहे. या व्यक्तीने माझे केस ओढले. तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो तरुण मुलीवर थेट लाथाबुक्क्याने मारहाण करताना दिसत आहे. तिला फरफटत खेचत आहे. तेथील काही लोकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो मारहाण करताना दिसत आहे. तिच्या नातेवाईकांनी पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon