गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेला आरोपी अवघ्या २४ तासांत गजाआड; कोळसेवाडी पोलिसांची झटपट कारवाई

Spread the love

गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेला आरोपी अवघ्या २४ तासांत गजाआड; कोळसेवाडी पोलिसांची झटपट कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेला लक्ष्य करून सोनसाखळी हिसकावून पळालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. ही घटना १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता गणेशवाडी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेजवळ घडली. ईला बरून घोष (वय ४८) या महिला नेहमीप्रमाणे कचरा टाकून घरी परतत असताना, एक अनोळखी इसम त्यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून कल्याण रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पसार झाला. घोष यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून गु.रजि.नं. ५४९/२०२५, भा.दं.वि. कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव व त्यांच्या पथकाने हाती घेतला. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानुसार प्रितम रमेश जाधव (वय ३१, रा. मिलिंद नगर, एफ केबिन, कल्याण पूर्व) याला अटक करून त्याच्याकडून चोरलेली ८ ग्रॅम सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त (परीमंडळ ३) अतुल झेंडे आणि सहायक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गणेश न्हायदे, पोनि. प्रशासन साबाजी नाईक, सहा. पोनि. संदीप भालेराव, पोहवा वाघ (५०३), जाधव (२१५), कदम (७७३), पो.शि. सोनवणे (२१३७), पो.शि. इंगळे (१५२६) यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. कोळसेवाडी पोलिसांच्या वेगवान व अचूक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon