भाईंदर मधील खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम शिक्षकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
भाईंदर,- भाईंदर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.हा अत्याचार करणारा नराधम भाईंदर मधील प्रसिद्ध क्लासेसचा शिक्षक असल्याचे समोर आले आहे.भाईंदर पूर्वे मधील शिक्षक लकी राय उर्फ पुणेनद्रु योगेंद्रनाथ राय असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. तो ५० वर्षाचा आहे. या नराधम शिक्षकाने १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी नववर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम शिक्षक २०२४ पासून सलग या मुलीवर अत्याचार करत होता.तिच्या आई-वडिलांसह तिला जिवेठार मारण्याची धमकी देत तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.अखेर नवघर पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. भाईंदर मधील एका खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.पीडित मुलगी एफवाय.बीए मध्ये शिक्षण घेत आहे. या तरुणीची २०२३ मध्ये या नराधम शिक्षकाची भेट झाली. त्यानंतर २०२४ मध्ये तिने त्याच्याकडे खाजगी शिकवणीसाठी प्रवेश घेतला. यावेळी संबंधित शिक्षकाने मुलीला विश्वासात घेऊन तुला करिअर संदर्भात योग्य मार्गदर्शन करेल असा विश्वास दिला. त्यानंतर संबंधित मुलीचे लैंगिक शोषण केले. आपण जे करतोय हे जर तू तुझ्या आई वडिलांना सांगितले तर आई-वडिलांसह तुला जीवे ठार मारणार अशी धमकी ही त्याने त्या मुलीला दिली होती.
त्यामुळे भीतीपोटी पीडित मुलीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली नाही. ते अत्याचार सहन करत होती. जवळपास वर्षभर हा सर्व प्रकार सुरू होता. पुढे ते तिला सहन करण्याच्या पलिकडे गेले. अखेर पीडित मुलींनी कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांना हे समजताच त्यांच्या पाया खालची वाळू सरकली.संबंधित शिक्षकाच्या विरोधात पोस्को अंतर्गत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भाईंदर पूर्व येथील प्रसिद्ध क्लासेस असून अनेक वर्षापासून हा संबंधित शिक्षक लकी राय उर्फ पुणेनद्रु योगेंद्रनाथ राय शिकवणी क्लासेस घेत आहे.दरवर्षी शेकडो विद्यार्थी या क्लासेसमध्ये प्रवेश घेत असल्याचे समोर आले.त्यामुळे पीडित मुली सारख्या अजून कोणत्या मुलींवर त्याने अत्याचार केले तर नाही ना? असा संशय ही निर्माण होत आहे. त्या दृष्टीने पोलिस ही तपास करत आहेत. या क्लासेसमध्ये जे विद्यार्थी शिकवणी घेत आहेत त्यांच्या पालकांना या घटनेची माहिती मिळाल्याने ते प्रचंड हादरले आहेत. मागच्या आठवड्यातच सर्व शाळा व महाविद्यालय व क्लासेस सुरू झाले असून नेमकं आपल्या विद्यार्थ्यांना या क्लासेसमध्ये ठेवायचे की नाही असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाला आहे.