३८ पाहिजे/फरार आरोपी अटकेत; परिमंडळ ०४ ची विशेष मोहीम यशस्वी
मुंबई – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४ यांच्या आदेशानुसार दिनांक ११ जून ते २० जून २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश लाभले आहे. या मोहिमेंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी ३८ पाहिजे आणि फरार आरोपींना अटक केली आहे. या विशेष मोहिमेसाठी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाण्यातून स्वतंत्र विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी आवश्यक एसओपी ची माहिती पथकांना देण्यात आली होती. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये:
३४ पाहिजे आरोपी
१३ शारीरिक हल्ल्याचे गुन्हे
९ मालमत्तेशी संबंधित गुन्हे
१२ इतर गुन्हे
४ फरार आरोपी
२ शारीरिक हल्ला
१ मालमत्तेशी संबंधित गुन्हे
१ इतर गुन्हे
या यशस्वी अटकेत १९८९, १९९३ व २००७ सालांपासून फरार असलेले गुन्हेगारही सापडले आहेत, जे अनेक वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर होते. ही मोहिम मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) श्री. विक्रम देशमाने, आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ श्रीमती रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिमंडळ ०४ अंतर्गत सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.