कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू तर २५ जण वाहून गेल्याची भीती
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्याच्या मावळ तालुक्यातून मोठी दुर्घटना घडली आहे. मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. जवळपास २५ ते ३० जण या दुर्घटनेत वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ही घटना खूप मोठी असल्याचं स्पष्ट होत आहे. इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पर्यटकांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. दुर्घटना घडली तेव्हा तिथे पर्यटकांसोबत लहान मुलंदेखील होती,अशी माहिती आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. तर दुसरीकडे रविवार असल्याने अनेकजण कुंडमळा येथील पर्यटनस्थळी फिरायला आले होते. याच दरम्यान जुना पूल कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती वर्तवली जात आहे. तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी या दुर्घटनेत ६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमाळा हा परिसर प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळावर नेहमी पर्यटकांची गर्दी होत असते.रविवार असल्याने कुंडमाळा परिसरात पर्यटकांची गर्दी होती. पण रविवारी दुपारनंतर इंद्रायणी नदीवरील जुना पूल खाली कोसळला. यावेळी नदीला देखील मोठा प्रवाह होता. त्यामुळे नदीत अनेक जण वाहून गेल्याचा अंदाज आहे.