कल्याण परिसरात ‘गांजा’ अंमली पदार्थ जप्त, महात्मा फुले चौक पोलिसांकडून कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण तसेच डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांच्यावर कारवाई करण्याकरीता पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हददीत दि.१०/०६/२०२५ रोजी चिकनघर परिसरात हॉली कॉस शाळेच्या पाठीमागील मैदानामध्ये एक रिक्षा क्रमांक एमएच/०३/डीएस/६९९२ हि संशयीत रित्या उभी असल्याचे दिसल्याने पोलीसांनी त्यांना हटकले असता ते रिक्षा मधुन पळून जावू लागले त्यांना पाठलाग करून ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी रिक्षा मध्ये गांजा हा अंमली पदार्थ विकी करण्यासाठी आणला असल्याचे सांगीतले. सदर रिक्षा चालक १) फैजल अस्लम शेख वय ३१ वर्षे, रा.सोनापूर, शालीमार हॉटेल जवळ, जलील प्लंबर चाळ, रूम नंबर ६, भांडूप पश्चिम व त्याचे सोबत २) अफसर सत्तार शेख वय ३६ वर्षे, रा. खर्बी गरीब नवाज मशिद जवळ, नागपुर, जावेद खानची खोली, नागपुर याचे ताब्यातुन अंदाजे ६ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अं.कि. ३,००,०००/- रू हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याचे विरूध्द महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गु.रजि.नं. ६९४/२०२५ अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (II) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी केली आहे. अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये अंमली पदार्थ विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.