कल्याणमध्ये ‘मेफोड्रोन (एम.डी.)’ या अंमली पदार्थासह एक इसम जेरबंद; विशेष पथकाची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांच्यावर कारवाई करण्याकरीता पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांच्या विशेष कारवाई पथकाने व टिळकनगर पोलीस ठाणे यांनी परिमंडळात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली.
खडकपाडा पोलीस ठाणे हददीत दि. १०/०६/२०२५ रोजी ९० फुट रोड, कचोरे, डोंबिवली पुर्व, जि. ठाणे येथे अब्दुल रहमान कुर्बान अली शेख वय २४ वर्षे, व्यवसाय रिक्षा चालक, रा. रूम नं. ३, फातिमा मंजिल, रामबाग, कल्याण प. याचे ताब्यातुन २२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अं.कि. ४४,०००/- रू हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याचे विरूध्द टिळकनगर पोलीस ठाणे गु.रजि.न. ॥ ४३७/२०२५, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि. १९८५ चे कलम २२ (ब), ८ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक व टिळकनगर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे. अशा प्रकारची परिमंडळ ३ कल्याण व डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.