मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांमध्ये राडा, एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारलं

Spread the love

मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांमध्ये राडा, एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारलं

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालक यांच्यात जोरदार राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून हा वाद मिटवला. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी नेण्यात आले. पार्किंगच्या वादातून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ही घटना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग परिसरीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालकाने वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क केल्यानंतर सुरक्षारक्षाकाने त्यांना हटकले. त्यामुळे त्यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच शा‍ब्दिक वादाचे रुपांतर हाणामारी झाले. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तसेच जमिनीवर लोळवून कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच एका पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेऊन दोघांमधील वाद मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हाणामारी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने एकटा पोलीस कर्मचारी काहीच करू शकला नाही. त्यानंतर सहारा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.याप्रकरणी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेने विमानतळ परिसरात एकच गोंधळ उडाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon