व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील संशयित मुलांवर कोळसेवाडी पोलिसांकडून कारवाई

Spread the love

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील संशयित मुलांवर कोळसेवाडी पोलिसांकडून कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – मॉडेल स्कुल कोळसेवाडी परीसरातील व्हायरल व्हिडिओमधील मुलांचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत वरीष्ठांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाने सदर व्हायरल व्हिडिओमधील अनोळखी मुलांची नावे निष्पन्न करून एकुण ६ मुलांना ताब्यात घेतले असून त्यापैकी ४ मुले ही विधी संघार्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेतलेल्या मुलांपैकी अथर्व रतनकुमार सावंत वय १९ वर्षे, जय जितेंद्र शिंदे वय १८ वर्षे व यांचे विरूध्द सिगारेट व तंबाखु अधिनियम २००३ चे कलम ४ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून इतर ४ अल्पवयीन मुले (विधी संघर्षित बालक) असल्याने त्यांना त्यांचे आई वडीलांचे समक्ष ताब्यात देवून समज देण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परी. ३ कल्याण अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे यांच्या आदेशाप्रमाणे व कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि दर्शन पाटील, पोहवा ३११२ सौंदाणे, पो.हवा. ६२५६ कापडी, पोहवा १५३२/ बोरसे, पोहवा १२२६ सांगळे, पो.शि.२६५६ सोनावळे, पोशि८४१४ गिते यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon