डोंबिवली हादरली ! १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार 

Spread the love

डोंबिवली हादरली ! १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार 

गर्भपातानंतर वेश्याव्यवसायात दिले ढकलून, चौघांना अटक तर मुख्य आरोपी फरार

योगेश पांडे / वार्ताहर 

डोंबिवली – डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे . मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून,तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तीच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला .अखेर या टिळक नगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली. पोलिसांनी एका महिलेसह तिचा पती, दोन पुरुष अशा चार जणांना बेड्या ठोकल्या. धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवली परिसरात राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून आशुतोष राजपूत या तरुणाचे त्यांच्या घरी येणे जाणे होते .तो देखील मसाले विक्रीचा व्यवसाय करत होता. याच ओळखीचा फायदा घेत आशुतोषने पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. अल्पवयीन मुलीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले . रागावलेल्या पीडितेने आशुतोषशी संपर्क साधून त्याचे घर गाठले .मायलेकीच्या भांडणाचा फायदा घेत आशुतोषने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोधा शोध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आशुतोष हा तिच्या आईला भेटत होता व तो मुलीला मी तुमच्या मुलीला आज या ठिकाणी बघितले त्या ठिकाणी बघितले असे सांगून मुलगी शहरातच आहे असे सांगत होता. मुलगी रागवलेली असल्याने ती परत येईल या आशेने पीडितेची आई आशुतोष वर विश्वास ठेवत होती. मात्र दोन महिन्यांपासून मुलगी घरीच न आल्याने तिला संशय आला. तिने याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. याचदरम्यान ही मुलगी डोंबिवली जवळील ग्रामीण भागात एका घरात असल्याची माहिती मिळाली . पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत या पीडित मुलीची सुटका केली. पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. मुस्कान शेख तिचा नवरा यांच्यासह दोन जणांना अटक केली. चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. आशुतोष राजपूत याने मुलीचं अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीता गर्भवती राहिली. तिला एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्या ठिकाणाहून या मुलीला मुस्कान शेख नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवण्यात आले होते तिथे या पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलन्यात आले. तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आशुतोष राजपूत हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon