एक दिवसीय माथेरान ट्रिपला गेलेल्या गोवंडी येथील दोघांचा पाली-भूतवली धरणात बुडून दुर्दैवी अंत
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणाऱ्या पाली-भूतवली धरणात बुडून मुंबईतील दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. इब्राहिम आझीज खान(२४) खलील अहमद शेख(२४) या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण हे मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गोवंडी येथील इब्राहिम आझीज खान,खलील अहमद शेख व हितेश जितेंद्र कांदू हे तिघे तरुण रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने माथेरान येथे एक दिवसीय माथेरान ट्रिप करू आणि परतू असे त्यांनी ठरवले. पुढे ते त्यांच्या पाळीव कुत्र्यासह रात्री तीन वाजण्याच्या सुमारास एक चार चाकी वाहनाने कर्जत तालुक्यातील नेरळ विभागात असणाऱ्या पाली-भूतवली धरण परिसरात आले होते. पाली भुतवली धरणात अंघोळ करून माथेरानला जाऊ यासाठी रविवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान हे तिघे तरुण स्नानासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र काही वेळातच इब्राहिम खान, खलील शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बु़डू लागले.
यावेळी त्यांच्यासोबत असणारा त्याचा मित्र हितेश जितेंद्र कांदू याने पहिले. हितेश कांदू हा ताबडतोब पाण्याच्या बाहेर येऊन मदतीसाठी स्थानिकांना बोलवले. स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हितेश कांदू याने त्याच्या बुडालेल्या मित्रांना शोधण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथे दोघांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या कुत्र्यांनी पहिले असता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. सदर मृतदेह हे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले. माती माफिया यांच्याकडून धरणातील माती काढली जाऊ असल्या ठिकाणी खड्डा होतो. मात्र बाहेरून आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसते. त्यामुळे त्यांचा पाण्याचा अंदाज चुकतो आणि अशा प्रकारच्या घटना घडतात. असे स्थानिकांचे म्हणणे आहे.