छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल दिलं नाही म्हणून चाकूचा धाक दाखवत तरुणांचा धुमाकूळ
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – शहरात काय चाललंय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क चाकूचा धाक दाखवत काही तरुणांनी पेट्रोल पंपावर धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.ही घटना रांजणगाव शेणपुणजी येथील पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. पेट्रोल टाकायला आलेल्या दोघांना पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने नकार दिल्याने संतप्त चार तरुणांनी चाकू काढत धुमाकूळ घातला.घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कॉल केला. आरोपींचा शोध सुरू केला आहे.
रांजणगाव फाटा परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसाढवळ्या किरकोळ कारणांनी असे प्रकार होत असल्याने खळबळ उडाली आहे. पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.