धक्कादायक ! पुण्यात बायकोची गळा आवळून हत्या; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह घेऊन बाईकवर निघाला; पोलीसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – गेल्या काहीदिवसांपासून पुण्यामधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सास्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलू लागली आहे. अशातच एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये पतीन आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क दुचाकीवरून प्रवास करत होता. त्यावेळी पोलिसांना हा आरोपी पती दीड वाजता सापडला. पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी पती राकेश रामनायक निसार हा रात्री दीड वाजता भूमकर पुलाकडून राकेश बायकोची बॉडी घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला ठोकल्या बेड्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मयत पत्नीचे नाव पत्नी बबिता राकेश निशार असे आहे. नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार घडला आहे. दोघा पती-पत्नीमध्ये नेमकं काय झालं होतं? आरोपी पती राकेश निसार याने आपल्या पत्नीला नेमक्या कोणत्या कारणामुळे संपवलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.
दरम्यान, आरोपी राकेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वामीनारायण मंदिराकडे जाण्याचं ठरवलं होतं. स्वामीनारायण मंदिराजवळ रात्रीसुद्धा काही प्रमाणात लोकं पाहायला मिळतात. विशेष म्हणजे राकेश दुचाकीवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जात होता, त्याला भीत वाटली नाही? त्याच्या डोक्यात नेमकं काय शिजत होतं याबाबत पोलीस दुपारी सविस्तर माहिती देतील. अद्याप खूनाचे कारण समोर आले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.