खेळताना लहान भावाच्या वादात मोठ्या भावाचा नाहक बळी; १९ वर्षीय आरोपीला अटक

Spread the love

खेळताना लहान भावाच्या वादात मोठ्या भावाचा नाहक बळी; १९ वर्षीय आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – सध्याच्या तरुणाईला मोबाईल आणि गेम्सचं व्यवसनच जडलं आहे. त्यातच, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसा कमावण्याच्या नादात अनेकजण कंगाल झाल्याचेही आपण पाहिलं आहे. त्यात, सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्याने ऑफलाईन गेमवरही फोकस केला जात आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये अशाच ऑफलाईन गेमच्या खेळात एका मुलाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवा व्यापार (ऑफलाईन गेम) खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं. त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी, पोलिसांनी १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. खेळता खेळता झालेल्या हत्याप्रकरणी १९ वर्षीय सोहेब शेखला अटक करण्यात आली आहे. १६ वर्षीय गणेश कुऱ्हाडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते. कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली. मात्र, खेळता-खेळता वादाला तोंड फुटले, मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली. त्यानंतर खेळ अर्धवट सोडून सगळे आपापल्या घरी परतले. कार्तिकने घरी येताच मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितले. गणेशने सोहेबकडे जात त्याला जाब विचारला. लहान असताना जाब कसा काय विचारला? या रागातून सोहेबने गणेशच्या पायात-पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले अन् लाथांनी मारहाणही केली. या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला, तातडीनं रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले. किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एका निष्पाप आणि कुठलाही संबंध नसलेल्या गणेशला आपला जीव गमावावा लागला. खरं तर गणेशचा आणि आरोपी सोहेबचा काहीच वाद नव्हता, मात्र भावाला केलेल्या मारहाणीचा त्याने जाब विचारला अन त्याचा यात नाहक बळी गेला.

नवा व्यापार” हा एक बोर्ड गेम आहे, जिथे खेळाडू खरेदी-विक्री आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे कमवतात आणि खेळात जिंकण्याचा प्रयत्न करतात. हा खेळ मुलांना आणि प्रौढांनाही आवडतो आणि त्यांना व्यवसायाची मूलभूत माहिती देतो. व्यापार-उद्योगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे हेच खेळाचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon