पालकांनो सवधान! ठाण्यात अनाधिकृत शाळांचा सुळसुळाट,१६ शाळांची यादीच आली समोर.
योगेश पांडे – वार्ताहर
ठाणे – ठाण्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील परवानगी नसलेल्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १६ शाळांचा समावेश आहे. वर्ग भरवण्याकरता कोणताही शासनाची मान्यता मिळाली नसल्याने या शाळांना अनधिकृत म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या शाळांमध्ये कोणत्याही वर्गासाठी पालकांनी आपल्या पाल्यांसाठी प्रवेश घेऊ नये असे आवाहनही शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
परवानगी नसलेल्या शाळांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे पालक आपल्या पाल्यांसाठी घराजवळच्या खासगी शाळांना प्रवेशासाठी प्राधान्य देतात. मात्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या काही शाळांना शासनाची परवानगी नसल्याचीच बाब समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण माध्यमिक विभागातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा असे शिक्षण विभागाचे आवाहन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात काही शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता अनधिकृतरीत्या शिक्षण संस्था चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता व नोंदणी क्रमांक तपासावा, असे आवाहन शिक्षण विभाग (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक अनधिकृत शाळांची यादी अशा प्रकारे आहे
१)आर.एन.इंग्लिश स्कुल, सर्वे क्र.११६/१६,१७ मौजे कोनगाव, ता.भिवडी, जि.ठाणे
२)इंग्लिश प्रायमरी माध्यमिक उच्च माध्यमिक स्कूल नवी वस्ती टेमघर ता.भिवंडी
३)एस.एस.इंडिया हायस्कुल दिवा
४)फकिह इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, म्युनिसिपल हाऊस क्र.१००८/०, न्यु गौरीपाडा, भिवंडी, जि.ठाणे
५)श्री. विदया ज्योती स्कूल, डावले, ठाणे
६)केम्ब्रिज इंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे
७)एस.एस. इंग्लिश हायस्कूल, ईश्वरपार्क, मुंब्रादेवी मेडिकल जवळ, मुंब्रादेवी रोड, दिवा
८)ओमसाई इंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे
९)पी.टी.आर.एस.डी.इंग्लिश स्कूल सर्व्हे नं. ५६ बल्याणी टिटवाळा ता.कल्याण
१०)चेतना हिंदी विद्यामंदिर, चक्की नाका, हाजी मलंग रोड, कल्याण (पू.), जि.ठाणे
११)ओम साई इंग्लिश स्कुल पिसवली
१२)रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कॉसमॉस आर्केड फेज-४, टीएमसी वॉटरटँकजवळ
१३)शारदा इंग्रजी माध्यमिक शाळा
१४)डी.आर.पाटील इंग्लिश मेडियम स्कुल तुर्भे नवी मुंबई
१५)अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई
१६)ओईएस इंटरनॅशनल स्कुल सेक्टर १२ वाशी नवी मुंबई
या शाळांकडे माध्यमिक शिक्षणासाठी आवश्यक शासकीय मान्यता उपलब्ध नाही. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनुचित असून, भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी सजग राहावे.