कपूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर;अनिल कपूर यांच्या आईचे निधन

Spread the love

कपूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर;अनिल कपूर यांच्या आईचे निधन

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर, चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि अभिनेता संजय कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. निर्मल कपूर यांच्या निधनामुळे त्या तिघांच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले आहे. कपूर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. निर्मल कपूर यांचे निधन शुक्रवारी २ मे २०२५ रोजी संध्याकाळी झाले. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

निर्मल कपूर यांचा जन्म २७ सप्टेंबर रोजी झाला. गेल्यावर्षी २०२४ मध्ये त्यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता. त्यावेळी अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतच्या खास आठवणींच्या फोटोंचे कोलाज शेअर केले होते. या फोटोंमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत संजय आणि बोनी कपूरदेखील दिसत होते. यात संपूर्ण कुटुंब एकत्र खूप आनंदी दिसत होते. अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या वडिलांचे निधन १४ वर्षांपूर्वी झाले होते. सुरिंदर कपूर हे त्यांचे वडील होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. २०११ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. १४ वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले होते.आता त्यांच्या मातोश्रींच्या निधनाने कपूर कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. सुरिंदर कपूर हे एकेकाळी कुटुंबासह पृथ्वीराज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मल कपूरही त्या गॅरेजमध्ये राहत होत्या. त्यांनी त्यांच्या मुलांचे योग्यरित्या संगोपन केले. आज त्यांची तिन्हीही मुलं बोनी, अनिल आणि संजय कपूर हे सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्ती आहे. ते तिघेही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon