जितेंद्र आव्हाडांची संकल्पना; ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची शरद पवारांनी सपत्नीक केली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील कोपरी पाचपाखडी येथे प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आलंय.ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराच्या मूर्तीची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड मंदिराची माहिती देताना म्हणाले, हे मंदिर १५०० टनाचं आहे.मंदिराचे खांब कोठेही जोडण्यात आलेले नाहीत. एकाच दगडाचा एक खांब आहे.या मंदिराला २६ खांब आहेत. हे सर्व दगड आपण तामिळनाडूतील खाणीतून घेतले आहेत. खाणीतून घेतल्यानंतर हे कर्नाटक येथे आणण्यात आले. तिथे कोरीव काम करण्यात आलं.४ वर्ष ५० मजूर येथे राहत होते. त्यांनी ही कलाकृती पूर्ण केली आहे. गेल्या चार वर्षांपासून या मंदिराचं काम सुरु होतं.
मंदिराच्या बांधकामात कोठेही स्टील किंवा सिमेंट वापरलेले नाही. पूर्णपणे दगडाने आणि हेमाडपंथी मंदिर आहे.मंदिराचे जे कोरीव काम आहे, तेच तुम्हाला तुळजापूरलाही दिसेल. हे कर्नाटकमधील मजूरांनी केली आहे. मंदिरात ३६ गजमुख आहेत. मूर्ती २००४ साली आणली होती.आंध्रप्रदेशातील कारागीराकडून ही मूर्ती साकारण्यात आली आहे.यामध्ये काही चूका झाल्या असतील आई भवानी माफ करेन, असं आव्हाड म्हणाले. हे मंदिर आता उभ्या महाराष्ट्रासाठी खुलं करण्यात आलं आहे.दरम्यान, मूर्तीची प्रतिष्ठापणा करत असताना मंदिराला सजावट करण्यात आली होती.