डॉ. शिरीष वळसंगकरांनंतर आणखी एका डॉक्टरची आत्महत्या

Spread the love

डॉ. शिरीष वळसंगकरांनंतर आणखी एका डॉक्टरची आत्महत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

सोलापुर – सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एका तरुण डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आदित्य नमबियार असे मृत शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. आदित्यने गळा कापून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले होते. आदित्य नमबियार डॉ. वीएम गवर्नमेंट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. २०१९ च्या बॅचचा तो विद्यार्थी होता. आदित्य सध्या भाड्याच्या घरात राहत होता. तिथेच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

प्राथिमक माहितीनुसार आदित्याने आत्महत्ता केली असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुगाणालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon