मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना !
चौथी मुलगी झाल्याच्या नैराश्येतून जन्मदात्या आईनेच केली हत्या. आरोपी आईला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात घडली आहे. चौथे आपत्य मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केली आहे. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील लोणीपाडा परिसरात पूनम शहा, सासर – पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेली महिला गरोदर असल्याने काही दिवसांपूर्वी तिच्या आईच्या घरी प्रसूतीसाठी आली होती. लोणीपाडा येथे या महिलेची सुरक्षित गृह प्रसूती झाली. यावेळी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गृहप्रसूती झाल्यानंतर महिलेला तिच्या बाळासह डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूनम शहा या महिलेने तिच्या बाळाच्या नाकातोंडावर हात ठेवून बाळाची हत्या केली.
याप्रकरणी डहाणू पोलिसांनी तपास आणि चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूनम शहा (३२) असं या महिलेचं नाव आहे. पूनम शहा या महिलेने स्वतःच्या बाळाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पूनम शहा या महिलेचं सासर पश्चिम बंगाल येथील असून, माहेर उत्तर प्रदेशातील आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिचे आई-वडील डहाणूतील लोणीपाडा परिसरात राहतात. पूनम शहा हिला तीन मुली असून पुन्हा गरोदर असल्याने ती प्रसुतीसाठी लोणीपाडा येथे आली होती. मात्र प्रसूती झाल्यानंतर चौथे आपत्य देखील मुलगी झाल्याने पूनम शहा हिने टोकाचं पाऊल उचलत स्वतःच्याच पोटच्या बाळाची नाकतोंड दाबून हत्या केली. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौथी मुलगी झाल्याच्या नैराश्येतून महिलेने आपल्या तान्ह्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना डहाणूमध्ये घडली. या प्रकरणी डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डहाणूतील लोणीपाडा येथे २५ एप्रिल रोजी आई-वडिलांच्या घरात तिची प्रसूती झाली. तिला चौथी मुलगी झाली. जन्मत: बाळाचे वजन ३ किलो होते. त्यानंतर तिला बाळासह डहाणू उपजिल्हा रुग्णालयातल्या प्रसूतीपश्चात काळजी कक्षात दाखल करण्यात आलं होतं. बाळ-बाळंतिणीची प्रकृती व्यवस्थित होती, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.