अंबरनाथ हादरलं ! भरदिवसा बिल्डरच्या घरावर गोळीबार; हल्लेखोर घटनास्थळावरून फरार

Spread the love

अंबरनाथ हादरलं ! भरदिवसा बिल्डरच्या घरावर गोळीबार; हल्लेखोर घटनास्थळावरून फरार

योगेश पांडे / वार्ताहर 

अंबरनाथ – अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

अंबरनाथमध्ये ही घटना घडली, बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्या दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला, या घटनेनं खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिवाजीनगर पोलीस तसेच क्राईम ब्रँचच्या टीमनं घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी कडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे, हे हल्लेखोर नेमके कोण होते? गोळीबार करण्यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय होता? हे अजून समोर आलेलं नाही, पोलिसांकडून या घटनेसंदर्भात तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon