दारु आणण्यासाठी रिक्षा चोरणाऱ्या एसी मेकॅनिकला कोळसेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

दारु आणण्यासाठी रिक्षा चोरणाऱ्या एसी मेकॅनिकला कोळसेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – दारुचं व्यसन हा चांगल्या माणसाला बरबाद करते. या व्यसनाच्या आहारी गेलेला मनुष्य काहीही करु शकतो. याचं आणखी एक उदाहरण कल्याणमध्ये समोर आलंय. त्याच्यावर एक रिक्षा चोरी केल्याचा आरोप आहे. प्रांजल बर्वे असं या मेकॅनिकचं नाव आहे. प्रांजलनं रिक्षा का चोरली? हे ऐकून पोलीस देखील हैराण झाले. त्याने दारु आणण्यासाठी रिक्षा चोरली. सीएनजी संपल्यावर रिक्षा एका ठिकाणी साेडून पसार झाला. अखेर सीसीटीव्हीच्या सहाय्याने रिक्षा हस्तगत केली आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारातून एक रिक्षा चोरीस गेली होती. रिक्षा चोरीला गेल्यानंतर या संदर्भात चोरीची तक्रार रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात केली. कोळसेवाडी पाेलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत होते. पोलिसाना माहिती मिळाली की, चोरीस गेलेली रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपोजवळ उभी आहे.

पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी जाऊन रिक्षा हस्तगत केली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. पोलीस कर्मचारी रोहित बुधवंत यांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या रिक्षा चोरट्याला शोधून काढले. रिक्षा चोरणारा प्रांजल बर्वे होता. तो एसी मेकॅनिकचे काम करतो. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस त्याने दारु प्यायली होती. त्याला अजून दारु पाहिजे होती. त्यासाठी त्याने त्याच्या इमारतीच्या बाहेर मैदानात उभी असलेली रिक्षा सुरु केली. दारु आणण्यासाठी निघाला. रिक्षातील सीएनजी संपल्याने ती रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपोसमोरबंद पडली. तो रिक्षा तिथेच सोडून घरी निघून गेले. नशेत केलेल्या कृत्याने तो कशा प्रकारे अटक झाला. ते विचार करुन आत्ता पश्चाताप करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon