मुंब्रा हादरलं ! चिमुकलीला खेळण्याचं आमिष दाखवून केला लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलीचा खून, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Spread the love

मुंब्रा हादरलं ! चिमुकलीला खेळण्याचं आमिष दाखवून केला लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलीचा खून, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – राज्यात मुली व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालले आहेत. आरोपींना कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. अशीच एक घटना मुंब्रा परिसरात घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एक संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली आहे. सोमवारच्या ( ७ एप्रिल) रात्री याच परिसरात मैत्रीसह खेळत असलेल्या एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवून या नराधमाने त्याच्या घरी नेलं आणि तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र यानंतर त्याने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून क्रूरपणे हत्या केली. हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाचे चक्र वेगाने फिरवली. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली आहे. मुंब्यातील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर परिसरातील श्रद्धा प्राप्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहात असलेल्या व्यक्तीने हे कृत्य केलं असून असिफ अकबर मन्सूरी (१९) असे या आरोपीचे नाव आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी माहिती देतांना सांगितले की, मुंब्रा शहरातील ठाकूरपाडा येथे एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एका डकमध्ये दहा वर्षीय मुलगी पडली होती. रात्री अकरा वाजताच्या सुमारास मुंब्रा पोलीस ठाण्यात काही स्त्रिया आल्यात. या बातमीची खात्री करण्यासाठी आमची पोलीस ठाण्याची एक टीम देखील घटनास्थळी रावाना झाली. सहावा मजल्यावरवरील बाथरूमच्या काही काच काढल्या होत्या. अग्निशामक दलाचे  जवानांकडून त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह काढण्यात आला. त्या नंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया कळवा येथे पाठवण्यात आला. पूर्ण खात्री करून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. संशयित जो आरोपी आहे तो ताब्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचा काही कारण नाही. अशाप्रकारे कुठलाही गुन्हा कुठल्याही गुन्हेगारांनी करायचा प्रयत्न केला तर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सक्षम आहे. काल रात्रीपासून आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे सह आमची पोलीस टीम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला आहे. इतर माहिती तपासानंतर निष्पन्न होईल, तेव्हा सांगण्यात येईल. असे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon