महाराष्ट्र हादरला! आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेल्या अल्पवयीन तरुणीच्या छातीवरून हात फिरवत पोलिसाचा अत्याचार

Spread the love

महाराष्ट्र हादरला! आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेल्या अल्पवयीन तरुणीच्या छातीवरून हात फिरवत पोलिसाचा अत्याचार

योगेश पांडे / वार्ताहर 

कोल्हापुर – महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. अशातच कोल्हापुरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेल्या तरुणीवर पोलिसाने अत्याचार केला आहे. पोलिस हा तरुणीचा जाब घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने छातीवरून हात फिरवत तिच्यावर अत्याचार केला. पोलिसाच्या या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन दिलीप घाटगे असे तरुणीचे छेड काढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पीडित तरुणी ही अल्पवयीन आहे. या तरुणीने हातावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी हाॅस्पिटल मध्ये जबाब घेण्यास गेलेला पोलीस कर्मचारी चेतन घाटगे याने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले आहे.

तू माझी मैत्रीण आहेस , काही अडचण आल्यास मला फोन कर असं म्हणत तिच्या पाठीवरुन, छातीवरुन हात फिरवला. पोलिस कर्मचाऱ्याचे गैरवर्तन पाहून तरुणीला धक्का बसला. या प्रकरणी पोलीस नाईक चेतन घाटगे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. चेतन घाटगे हा शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक आहे. जखमी मुलीचा जबाब नोंदवित असताना रुग्णालयत पोलिसाकडूनच असभ्य वर्तन घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon